Breaking News
Loading...
Sunday, 12 April 2009

Info Post
सासुने एकदा आपल्या तिन जावयांची परीक्षा घेण्याचे ठरविले. तिला बघायचे होते, कुणाचे तिच्यावर जास्त प्रेम आहे. मोठ्या जावयाला ती नदीकाठी फिरायला घेउन गेली. तिथे तीने पाय घसरल्याचे नाटक केले. जावयाने पटकण तिला बाहेर काढले व तिचा जिव वाचवला. दुसर्‍या दिवशी त्याच्या दारात नविन मोटर सायकल उभी होती. ' प्रेमळ सासुकडुन भेट.'

मधल्या जावयाबरोबर पण तेच नाटक केले गेले, त्याने पण तिल तत्परतेने तिला वाचवले. दुसर्‍या दिवशी त्याच्या दारात नविन मोटर सायकल उभी होती.

धाकट्या जावयाबरोबर त्याची परीक्षा घ्यायला नदी काठी गेली व पुन्हा तेच नाटक केले. जावयाने मनात म्हटले, ' आयतीच बुडून मरते तर मरु दे' व त्याने दुलर्क्ष केले आणि ती मेली.

परंतु दुसर्‍या दिवशी त्याच्या दारात  आठ लाखाची नवी कोरी गाडी उभी होती. " धन्यवाद, प्रेमळ सासर्‍याकडून भेट."

0 comments:

Post a Comment