Breaking News
Loading...
Thursday, 19 November 2009

Info Post
प्रेम करायचे नाही, पुन्हा कधी फिरून!
का कळत नाही, पण नक्कीच काहीतरी होतंय!
वेड्या या मनामध्ये, बहुतेक कोणीतरी बसलंय!

आजकाल मला जरा लवकर जाग येते,
कॉलेजमध्ये जायची खूप घाई लागते!
नास्ता करायची सुद्धा मला शुद्ध नसते!
फक्त तिलाच पाहण्याची आस मनात असते!

कॉलेजमध्ये डोळे तिलाच शोधत असतात,
कॅन्टीन, कॅम्पस, क्लासरूम सगळीकडे फिरतात!
ती मात्र कुठेतरी अभ्यास करत असते,
मैत्रिणींच्या घोळक्यात कुठेच कधी नसते!

खूप खूप वाटत तिच्याशी कधीतरी बोलाव,
जवळ तिला घेऊन सार काही सांगाव!
मनातले भाव मात्र ओठावर कधीच येत नाही,
तिला जाऊन बोलण्याच धाडस कधी होत नाही!

समोर कधी आलीच तर डोळे आपोआप झुकतात,
माझे सेवक असूनही चाकरी तिची करतात!
शब्द सुद्धा तेव्हा माझ्याशी फितुरी करतात,
कुणास ठाऊक का, सगळे असे का वागतात!

कॉलेजमध्ये एकदा ती साडी घालून आली,
नव्या नवरीवाणी सजून-धजून आली!
पाहता क्षणीच तिला भान हरपुन गेले,
तिच्याच रुपामध्ये सारे विसरून गेले!

पण काल जेव्हा तिला मी त्याच्याबरोबर पहिले,
काळजातील स्वप्न खळकन तुटले!
आवाजसुद्धा होऊ दिला नाही मी तुटलेल्या काळजाचा,
मनातच दाबल्या भावना, वेड्या या मनाच्या!

खूप खूप ठरवले कि रडायचे मात्र नाही,
इथेसुद्धा डोळ्यांनी माझी साथ दिली नाही!
तुटून गेले हृदय, अन काळीज गेले चिरून,
प्रेम करायचे नाही, पुन्हा कधी फिरून!


-
सागर जाधव!

0 comments:

Post a Comment