Breaking News
Loading...
Tuesday, 8 December 2009

Info Post
फुटलेल्या चष्म्यातून....
माझं ना आभाळाशी एक नातं आहे...
मैत्रीच म्हणा नं...
अगदी लहानपणापासून...
एक टक आभाळाकडे बघत बसायचो...
ती सारी निळसर छटा मनात उतरायची...
मनभर पसरायची...
हजार प्रश्न पडायचे..
वाटायचं त्याच्या कडे नक्की उत्तरं असतील...
काही उत्तरं मिळाली..
काही मिळतील...

आताशा माझी नजर पृथ्वी कडे वळू लागलीये..
जगण्याची भाषा मला आताशा कळू लागलीये..
बघतो सारे..
फसवी गणिते..
त्यांची फसवी उत्तरे..
लटक्या जगण्याच्या
लटक्या खेळ्या...
लटके डावपेच..
भेसूर चेहेरे..

परत आभाळाकडे पाहू लागलोय..
पण आभाळही ठिकर्या होऊन परत जोडल्या सारखं दिसतंय...
फुटलेल्या चष्म्यातून पाहिल्यासारखं..
ओरखडा उठलेल्या मनातून पाहिल्यासारखं...


--
हर्षद कुलकर्णी

0 comments:

Post a Comment