काही कळत नाही, ठेच लागत जाइ, जरी पडलो पुन्हा पुन्हा
मी काटली सजा, माझ्या भरल्या ईजा, आज खुणवी नविन गुन्हा
मी वळत गेलो, मन जाळत गेलो, केल्या कितीक तडजोडी
तरी मधुनचि, कधी वाटे काढावी, सार्या दुनियेची खोडी
उरे कोळसा काळा, सुंभ जळाला सारा, पण पीळ त्याचा जाईना
मी काटली सजा.......
मी चांगला झालो, मी वायाही गेलो, कधी झालो मी व्यवहारी
ल्यालो फाटके कधी, किंवा कापडं साधी, कधी घातली भरज़री
तरी कपाटात, अजुनही माझ्या, ठेवणीतला सदरा जुना
मी काटली सजा.......
मी फसलो खूप, उगा हसलो खूप, कधी उगीच गहिवरलो
कधी वेडा मी झालो, कधी शोधतांना काही, स्वतःच हरवलो
पण जाऊदे सारे, एक वाटते खरे, की जगलो क्षणा क्षणा
मी काटली सजा.......
कवि : आशिष
Marathi Kavita : आज खुणवी नविन गुन्हा
Info Post
0 comments:
Post a Comment