Breaking News
Loading...
Thursday, 8 December 2011

Info Post
अस्थाला जाणारा सूर्य
निसर्गाची होणारी घुसमट,
आज एक संकेत देत आहे .....
रात्र हि वैर्याची आहे...............

गावाबाहेरची पडकी विहीर
नरसोबाच्या नावाचा उतारा,
अमावस्ये चा चंद्र साक्षीला आहे ......
रात्र हि वैर्याची आहे...............

वेशी कडचे चिंचेचे झाड
रात्री अपरात्री टीवटीवनारी टिटवी,
जंगली कुत्र्याचं आकसून रडण सांगत आहे
रात्र हि वैर्याची आहे...............

मैलो अंतराची पाऊल वाट
रस्त्यात लागलेली मसणवाट ,
चिता जाळण्यात मग्न आहे
रात्र हि वैर्याची आहे...............

दूर कुठे ओसाड रान
पिकलेल ते उसाचे शेत ,
आज कोल्हयांची गर्दी वाढतच आहे
रात्र हि वैर्याची आहे...............

खळ खळ वाहणारा ओढा
अवती भवती पसरलेली शांतता ,
आज ओरडून ओरडून सांगत आहे
रात्र हि वैर्याची आहे...............

पडलेल्या घराच्या भिंती
हवेने वाजलेली कडी ,
कोणीतरी असल्याचा भास होत आहे
रात्र हि वैर्याची आहे...............

मध्यान रात्रीची वेळ
तीच श्वासांची कुजबुज
अजूनही रात्र सरायला वेळ आहे
रात्र हि वैर्याची आहे...............

अंधाराच्या चादरीला पडलेलं चिद्र
एक सूर्य कवडसा आत आला आहे
ह्या पाहते नंतर ती रात्र..... पुन्हा येणार आहे
रात्र हि वैर्याची आहे...............रात्र हि वैर्याची आहे..

कवि : रोहन पाटील

0 comments:

Post a Comment