Breaking News
Loading...
Sunday, 24 June 2012

Info Post
Source : Internet Search
माझं हरवलेलं बालपण
आजही आठवून पाहतो आहे
या मोठयांच्या गर्दीत
स्वत:लाच कुठेतरी शोधतो आहे

त्या निरागसतेची
आता खरी खूण पटते
त्या निर्व्याज हास्याची
आता खरी गरज वाटते

आता प्रत्येकाशी
वेगळा हिशेब मांडून बसतो
समोर कुणीही असला तरी
गरज पाहूनच थोबाड ताणतो

शब्दांनाच देत शब्दांचे विळखे
उभारतो शब्दांचेच इमले
या शब्दांच्या खेळत
माझे सारे जगच थांबते

डाव अनेक मांडून बसतो मी
खरेपणाने काही खेळता येत नाही
हरण्यातली गोडी कसली
जिंकण्यातला आनंदही मला गवसत नाही

परत एकदा लहान व्हायचं आहे
पण काही होता येत नाही
आिण या मोठयांच्या जगात
मला कुणी आपलेसे वाटत नाही



कवि : विशाल

0 comments:

Post a Comment