आईला खोट सांगुन यायचो फक्त...तुझ्यासाठी,
खुप बहाणे बनवायचो...तुला भेटण्यासाठी.
क्लासला दांडी मारायचो...तुला पाहण्यासाठी,
रात्रभर जागा असायचो...तुझे एस.एम.एस.
वाचण्यासाठी.
खुप वेळा मार खाला...तुझ्या प्रेमासाठी,
नेहमी मोबाइल कड़े लक्ष जात...तुझा मिसकॉल
पाहण्यासाठी.
मागे वळून वळून
पहातो...तुला इशारा करण्यासाठी,
पाऊसआल्यावर रडून घेतो...अश्रु लपवण्यासाठी.
मला सोडून नको जाऊ...सगऴ्यांशी
नाती तोडली फ़क्त तुला मिळवण्यासाठी,
रडून रडून मरून जाईन...फ़क्त तुझ्या प्रेमासाठी.
तू कसही ठेव...मी जगेन आणि मरेन फ़क्त
तुझ्यासाठी,
पण तू सोबत नसशिल तर सांग जगु कोणासाठी?
कवि : ____
Marathi Kavita : तुझ्यासाठी....
Info Post
0 comments:
Post a Comment