Breaking News
Loading...
Monday, 18 November 2013

Info Post
दुःख एका प्रेमवेड्याचे...!!

आयुष्यात तु असुनही,
नशिब माझं हुकलं होतं,
तुझ्यावर खरं प्रेम केलं,
ईथेच जरा माझं चुकलं होतं.....

शब्द रचताना तुझ्यावर,
ह्रदय बिचारं रडलं होतं,
माझ्या मनाची व्यथा ऐक जरा,
तुझ्याविणा खुपकाही अडलं होतं.....

तु नाही समजलीस माझ्या भावनांना,
तुझ्यावाचुन जगणं कठीण झालं होतं,
सांगायच तर होतं तुला बरच काही,
तु माझं काहीच ऐकलं नव्हतं.....

तु मला सोडून जाण्या अगोदर,
दोन क्षण मरण माझं थांबलं होतं,
जाता जाता माझ्या मनाला दगडाच कर,
असं तुला सांगायच राहीलं होतं.....

तुझ्याविणा एकटेपणात जगताना,
मनात भावनांच आभाळ दाटलं होतं,
तु एकटं टाकून गेल्यावर,
माझं आपलं कुणीच उरलं नव्हतं.....

कवि : ________

0 comments:

Post a Comment