नजरेची भाषा नजर समजते.
वा मुलाकातीतून गुज उमलते.
हृद्याचे न्यारे स्पंदन घडते.
ओठांना मग कोरड पडते.
काय झाले न कोणास कळते.
मनात अविरत हुर – हुर मोहते.
आता कोणाचे भानच नसते.
भेटीसाठी मन व्याकुळ होते.
अन हेच ते पहिले प्रेम असते.
विधात्याची मोठी देन असते.
लाभले तर नसीब महान असते.
नाहीतर आठव रूपी डायरीच पान असते.
पहिल्या प्रेमाचा तो कस्तुरी गंध.
सर्वकाळ मनास सुखावी मंद – मंद.
पहिल्या प्रेमाची नशाच वेगळी.
तुल्य ना कशाशी , धुंदीच आगळी....
कवि : बाळासाहेब तानवडे
Marathi Kavita : प्रेम
Info Post
0 comments:
Post a Comment