सखे आज या गुलाबी पहाटेला..
मला कशी काय जाग आली..
जणु माझ्या झोपेलाही..
तुझ्या भेटीची चाहूल लागली...
सारं काही नवीन घडतयं..
भावनेचं बीज अल्हाद अंकूरतयं..
अस भासत होतं अन उगाच
कुठेतरी स्वप्नील जग अस्तित्वात अवतरत होतं...
तुझ्या मनाची ती घाई.. अन काळजाची धकधक
माझ्या पावलांचा वेग वाढवत होती..
हलक्याश्या एका किंतूच्या भितीने..
कपाळावर जमा झाले घामाचे मोती..
अखेर तू समोर दिसलीस अन
डोळे स्तब्ध खरोखर स्तब्ध झाले..
तुझ्या सौंदर्याचे ते नक्षत्र पाहूनी..
शब्द माझे ओठांवरच निमाले..
तुझ्या डोळ्यातली चमक पाहून
मलाही जरासं बरं वाटलं
माझ कृष्णवर्णीय रूपांन
तुझ्या मनात छोटूसं घरकूल थाटलं..
एरव्ही भेटायच भेटायचं म्हणून
हट्ट करणारी अचानक अबोलीच फुल झालीस तु..
पापण्या झूकवून माझ्या समोरी..
मंद गतीने येऊनी उभी राहीलीस तू..
तुझ्या हनूवटीला माझ्या तर्जनीचा आधार..
खरोखर लाजवूनी गेला...
माझ्या डोळ्यात डोळे घालून बघण्याचा
एक प्रेमाचा राज सांगूनी गेला..
तुझा माझ्यावरचा विश्वास ,
चेहर्यावरच्या आंनदात चमकूनी गेला..
अन आपल्या ह्या भेटीचा हा सुगंध..
त्या अलवार मिठीत दरवळूनी गेला........
Marathi Kavita : आज या गुलाबी पहाटेला...
Info Post
0 comments:
Post a Comment