काहीही नसेल तरी....उगवीन मी
पाणी कमी असेल तरी....जगीन मी
कोणाचं लक्ष नसेल तरी....वाढीन मी
दुर असाल तर....हिरवा दिसीन मी
फार जवळ आलात तर....काट्यासारखं बोचीन मी
बोचून घ्यायला तयार असाल तर....जवळ घेईन मी
कुठल्याही परिस्थितीत....रंग बदलणार नाही मी
फुलं माझ्याकडे नसली तरी....हिरवागार राहीन मी
फळं दिली नाहीत तरी....प्रत्येक वाटेवर असीन मी
आणि कोणात नसल तरी....स्वत:त नक्की असीन मी
Marathi Kavita : काहीही नसेल तरी....
Info Post
0 comments:
Post a Comment