जख्मा तू किती ही दे
जख्मांच काही वाटत नाही
पण फुंकर मारायला तू आलीस
हे काही पटत नाही
त्या येऊन जाणा-या लाटेशी या बिचा-या किना-यानं कसं वागावं..?ती परकी नसली तरी त्यानं तिला आपलं कसं मानावं..?
कितीही म्हटलं तरी,मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचंया चातकाला व्याज मागता येत नाही.
तू अलगद हात धरलासनि दुसरा हातही त्यावर धरलासदोन हातांच्या एका शिंपल्यातमाझा हात मोत्याने भरलास
पावसाच्या थेंबालाही माहित नव्हतं,
तो कुठे वाहतोय...
सहज विचारलं तर म्हणाला,
"मीही तेच पाहतोय..."
0 comments:
Post a Comment