दुकानात डायरी पाहिली की
तिला विकत घ्यावंसं वाटतं
रोजच्या आठवणींचे गुंते
कागदावर सोडवावंसं वाटतं
तोच दिवस, तशीच रात्र
जिवनात काय आहे तरी नवं
सगळंच पोकळ वाटतं
मला काही वाटत नाही हवं
क्षण, शिक्षण बनायला
ते डोक्यात उरावे लागतात
प्रसंग, आठवणी बनायला
ते कुठेतरी मुरावे लागतात
दर क्षणाला कैद करणारा
माझा हा अट्टाहास कसला
क्षणाला, क्षणासारखं जगतो मी
माझं जीवन, रुका हुआ फैसला
चांगले प्रसंग कधीच आठवत नाहीत
मी फक्त वाईट प्रसंगांना आठवतो
म्हणून भुतकाळात जगणाऱ्यांसाठी
मी डायरी दुकानातच ठेवतो...
Marathi Kavita : डायरी
Info Post
0 comments:
Post a Comment