Breaking News
Loading...
Wednesday, 27 July 2011

Info Post
विहगा विहार करी गगनात
विहंग अवलोकनही करुनी
स्वच्छान्दाने घेई भरारी
निर्भय होई मनात

स्वपंखांच्या बल सामर्थ्ये
पवनावारी आरूढ होऊनी
गतिमान अवकाशात

ध्येयपूर्ती तुजप्रती लाभूनी
यशप्राप्ती जवळी हि असुनी
येई तू घरट्यात

असती आप्तजन वाट पाहत
भाव प्रेमळ असे मनात
वत्सलता नयनात

ऋणानुबंधाची हि नाती
जपुनी ठेवी हृदयात
सुखी होशील जीवनात



कवि : _____



0 comments:

Post a Comment