भरलेला पाऊस मी
भरलेल्या डोळ्यांनी पहिला होता
भर पावसात हात निसटतानाहि
अश्रू डोळ्यात राहिला होता
होते रुसवे फुगवे होते अनेक बहाणे
तिला चिडवून तिलाच समजाविणे
तिच्या आठवणीत मन माझे शहारले होते
तिच्या सोबत घालवलेले क्षण तेव्हा डोळ्यातून निसटले होते
माझे अश्रू सुद्धा त्या पावसात मिसळले होते
साथ माझी सोडताना मी त्यांना पहिले होते
मनाचा नभ डोळ्यांच्या काडानवर विसावला होता
तू दूर गेल्यावर तो बांधहि त्यांनी फोडला होता
सुटलेला गार वारा मला स्पर्शुनी सांगत होता
आता हा खेळ फक्त आठवणींचा राहिला होता
भरलेला पाऊस मी
भरलेल्या डोळ्यांनी पहिला होता
कवि : शशांक जाधव
Marathi Kavita : भरलेला पाऊस
Info Post
0 comments:
Post a Comment