अशी आहे माझी प्रेयसी
प्रेमाला प्रेम
समजणारी ती प्रेयसी आहे माझी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम
करणारी...
खुबसुरत नसली तरी,
चारचौघात मला शोभून दिसणारी
शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी
बागेतल्या फुलांसारखी सुंदर
नसली तरी,
पण
अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र
हाय… हेलो… नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी
पण मनाने सुंदर
नात्यांच्या नाजुक
धाग्यांना हळुवार जपणारी……
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम
करणारी…..
अशी आहे
माझी प्रेयसी………
कवि : _______
Marathi Kavita : माझी प्रेयसी
Info Post
0 comments:
Post a Comment