काल लग्न झालेली माझी मैत्रीण मला भेटली, सवाशनीच्या लेण्यामद्धे अजूनच सुंदर वाटली...!
नजरा-नजर होताच ती 'पुन्हा' एकदा लाजली, आमच्या पहिल्या भेटीची आठवण, ताजी करून गेली...!
"कशी आहेस?"
विचारताच, नेहमीचेच उत्तर मिळाले, पण चेह~यावर, कुणास ठाऊक, तिने उगाच, उसने हसू आणले...!
दोघा सौमित्रांच्या गप्पा- गोष्टी अशा काही रंगल्या, चेह~यावर हास्य आले...
डोळ्यांच्या कडा मात्र पाणावल्या...!
'व्यक्त न केलेल्या भावना सांगाव्या', अशी कल्पना मनात आली, पण माझी नजर पुन्हा एकदा तिच्या कुंकवाकडे गेली...!
असेच काहीतरी, तिच्या मनालासुद्धा वाटले, पण कदाचित सप्तपदींच्या वचनांनी तिला रोखले...!
शेवटपर्यंत दोघेही, मनातले ओठांवर आणू नाही शकले, साता जन्माच्या नात्यापुढे प्रेम हे, पुन्हा एकदा झुकले...!
Link : #B_Red
Marathi kavita : मैत्रीण
Info Post
0 comments:
Post a Comment