Breaking News
Loading...
Saturday, 16 May 2015

Info Post
कधी कधी अस वाटत..
आपण हि कोणावर तरी प्रेम कराव...
जगाच्याच नकळत,
कोणाला तरी आपल म्हणाव..
रोज फक्त तिच्याशीच बोलण्यासाठी, काहीही कराव..
अन बोलता बोलता...
फक्त तिच्यात हरवून जाव...
कधी कधी अस वाटत...
आपण हि कोणासाठी तरी जगाव..
कोणाच्या तरी हास्यात,
आपल सगळ विश्व शोधाव...
ते शोधता शोधता,
आपण हि तिच्यात हरवून जाव...
अन आपल्याच नकळत,
तिने ते तिच्या डोळ्याने सांगाव...
खरच..
कधी कधी अस वाटत...
आपण हि कधी तरी प्रेमात पडाव...
निरागस त्या प्रेमाच्या,
धो धो पडत्या पावसात भिजाव...
कधी कधी हसव,
तर कधी कधी रडव...
अन आयुष्याला...
त्या एकाच क्षणात..
संपूर्ण पणे जगून घ्याव...
संपूर्ण पणे...
एकाच क्षणात आयुष्य जगून घ्याव.


कवि : ___________

0 comments:

Post a Comment