Breaking News
Loading...
Friday, 15 May 2015

Info Post
जवान :- मी सीमेवर युद्धासाठी चाललो आहे,
जर मी परत येऊ नाही शकलो तर तू
दुसर्या मुलाशी लग्न
कर...
त्याची प्रेयसी :- (त्याच्याकडे बघून
हसायला लागते)
जवान :- माझा विश्वास नाही बसत ........तू
हसतेस ????
प्रेयसी :- एक वेडा मुलगा रस्त्याने
चालला होता,
तो कधी डावीकडे पळायचा, तर कधी उजवीकडे
पळायचा,
कधी मागे पळायचा तर कधी पुढे पळायचा,
मधेच खाली बसायचा तर मधेच एकदम उंच
उडी मारायचा ......
हे बघून लोकांनी त्याला विचारले, "हे तू काय
करत आहेस?"
तेव्हा तो म्हणाला,
"अहो बघाना केव्हा पासून
हि सावली माझा पाठलाग करत
आहे,
मी जिथे जाईल तिथे येत आहे,
मी कितीही प्रयत्न केला
तिच्या पासून दूर
पळण्याचा तरीही ती मला सोडत नाहीये ..
असे म्हणून त्याने पुन्हा एक
उडी मारली आणि तो एका गाडी खाली येऊन
मरण पावला पण
तरीही त्याची सावली त्या त्याच्या देहा बरोबर
होती.
एवढे बोलून ती प्रेयसी त्याच्या कडे पाठ करून
उभी राहते,
तिचे हसणे बंद होते
आणि मग म्हणते ............. "वेड्या,
अशी मी तुझी सावली आहे रे.




कवि : ___________

0 comments:

Post a Comment