Breaking News
Loading...
Tuesday, 4 November 2008

Info Post
तु असतास तर..


डोळे कधी भरले नसते
रुमालाचे शेव कधी
आसवांनी भिजले नसते
डोळे पुसता पुसता
............हात माझे थकले नसते.


तु असतास तर..
गालावर फुललेले गुलाब
अकाली कोमजले नसते
स्वप्ने पहायच्या वयात
जिथे प्राजक्त फुलायचे
...........तिथे काटे रुतले नसते.


तु असतास तर..
सजली असती मग निशीगंधाही
हंसली असती मग परसातली
अबोल मुग्ध ती रातराणीही
कुंपणावरच्या जाई-जुईंनी
............कुजबुजणे सोडले नसते.


तु असतास तर..
असले असते माझे असणेही
तुझ्या असण्यातले माझे
माझ्या असण्याला शोधणेही
भिरभिरणार्‍या पापणीने मग
...........क्षितिज शोधणे सोडले नसते.

0 comments:

Post a Comment