Breaking News
Loading...
Friday, 6 December 2013

Info Post
प्रत्तेक पहारा भीतीचा नसतो,
अन प्रत्तेक शहारा प्रीतीचा नसतो,
प्रत्तेक दोष माणसाचा नसतो,
कधी कधी निर्णय नियतीचा असतो....

आयुष्याच्या बुद्धिबळा प्यादे आपण,
कटपुतलीसारखे खेळत असतो,
आपण सगळे निमित्ते मात्र असतो,
काही गोष्टींचा निर्णय आधीच ठरलेला असतो.

प्रत्तेक अश्रू दु:खाचा नसतो,
अन प्रत्तेक क्षण सुखाचा नसतो,
एवढ्या मोठ्या जगातला,
एखादाच माणूस आपल्या हक्काचा असतो..

0 comments:

Post a Comment