आठवणींच्या पावसाने ,
अंग अंग भिजून गेले…
कांही थेंब सुखावून गेले,
कांही मन हेलावून गेले….
सुखाचे थेंब ओघळून गेले,
गारठ्यातही अंग शहारले…
बाकी थेंब अंगात भिनले,
पावसातही जाळत राहिले….
आठवला तो पहिला पाऊस,
तुझ्या माझ्या भेटीचा…
डोळे पाणावून गेला ,
आज पाऊस आठवणींचा….
कवि : अरविंद
आठवणींच्या पावसाने ...
Info Post
0 comments:
Post a Comment