Breaking News
Loading...
Tuesday, 29 July 2008

Info Post
मी म्हंटले,माझे तुझ्यावर प्रेम आहे..
पण मी खोटे बोलले..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..
प्रेमापेक्षाही जास्त आहे..
कसे असु शकते प्रेम...
इतके चांगले की , दोन अनोळखी दोस्त बनले,
इतके निरागस की , प्रेमही दोस्तीत गुंफ़ले गेले,
इतके हवेसे की, सर्व कॉल वाटत असतात तुझे,
इतके मुर्ख की , रोमिंग चाही चालतोय मला खर्च,
इतके प्रेरक की ,सरळ आयुष्यही झाले आहे दिलखेचक,
इतके हळवे की , तुझ्यावरील संकटाने डोळे भरतात माझे,
इतके तेजस्वी की , तु आठवणिंनी ओजंळ भरलीय माझी,
इतके निस्वार्थि की , तुझ्या लग्नाला पाहुणी आहे मी..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..
प्रेमापेक्षाही जास्त आहे..प्रेमापेक्षाही जास्त आहे..

- स्वप्ना

0 comments:

Post a Comment