Breaking News
Loading...
Thursday, 10 July 2008

Info Post
सरी ग सरी……
सरी ग सरी……
आल्या ग सरी…..
आल्या ग सरी…..

काळ्या मेघाची तू लेक
आलि वाजत गाजत
ह्या भल्या पावसात
चिंब निघालि भिजुन..

ओलि ओलि तुझी काया
वेगळिच असे माया
फ़ुटे मातीला अंकुर..
स्पर्श तुझाच वेगळा

कोणी दुखात रडते..
कोणी सुखात रडते
तू भिजवून त्यांना..
त्यांच्या आश्रूच झाकते

सुर्य रोजची उगे
किरणे आकाशि पसरे…..
परी..
तुझ्या थेंबांनाच छेदुन
इंद्रधनुष्य ते दिसे

प्रेम दिले तू अपार
तुझे थोर उपकार
माझ्या प्रेमाची ग सखे..!
तू एक ..खरी साक्षिदार…

सरी ग सरी
सरी ग सरी

तू एक ..खरी साक्षिदार..

–स्मिता भरविरकर

0 comments:

Post a Comment