Breaking News
Loading...
Monday, 18 August 2008

Info Post
आपल्याला जे काही वाटते ते मोकळेपणानं सांगण्याचा अत्याधुनिक प्रकार म्हणजे ब्लॉगिंग. दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या या ब्लॉगिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक केस मुंबई हायकोर्टात आली आहे.

बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेल्या मुंबईच्या ग्रेमॅक इन्फ्रास्ट्रक्टर इक्विपमेंट अँड प्रोजेक्ट लि. कंपनीने हायकोर्टात एका ब्लॉगरला कोर्टात खेचलंय. पण हा ब्लॉगर पक्का इरसाल आहे. तो ' टॉक्सिक रायटर ' या टोपणनावाने ब्लॉग लिहितो. त्यामुळे त्याचा हा ब्लॉग होस्ट करणा-या आणि जगातील अव्वल वेबकंपनी असलेल्या गुगलललाही कोर्टाच्या पाय-या चढाव्या लागल्या आहेत.

या अज्ञात व्यक्तीने ब्लॉगवर २६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या एका पोस्टमुळे बदनामी झाल्याचा कंपनीचा दावा आहे. गुगलच्या ' ब्लॉगर ' या सेवेचा वापर करुन ही बदनामी झाल्यामुळे गुगलने या ब्लॉगरची माहिती द्यावी अशी मागणी कंपनीने केली आहे. पण अशी माहिती दिल्याने ब्लॉगिंगच्या संकेतांनाच धक्का लागतो. त्यामुळे ही माहिती कशी द्यायची या धर्मसंकटात गुगल पडले आहे.

गुगल ब्लॉगरने स्वतःची माहिती लपवण्याचा निर्णय घेतल्यास ती सार्वजनिक करणार नाही असे आश्वासन देते. त्यामुळेच अनेक ब्लॉगर मुक्तपणे आपले विचार मांडतात. मात्र या केसच्या निमित्ताने प्रथमच एका ब्लॉगरची माहिती मागवण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टानही कंपनीची बाजू ऐकून घेऊन गुगलची भारतातील उपकंपनी ' गुगल इंडिया ' ने एक महिन्यात आपली बाजू मांडावी असे सांगितले आहे.

या केसमध्ये गुगलकडून ब्लॉगरची खरी ओळख देण्यात आली तर आजवरच्या ब्लॉगिंगच्या इतिहासातील ही पहिली घटना ठरेल. तसेच जर गुगलने माहिती देण्यास नकार दिला तर भारतात प्रथमच एका ब्लॉगमुळे गुगलवर कारवाई होईल. यामुळे या केसला भारतीय इंटरनेटच्या जगात महत्त्व आले आहे.


Source: Maharashtratimes.com

0 comments:

Post a Comment