सांग मला विसरशील का ते क्षण ?????????
पावसाला उत आला होता
नभ पण बेफान झाले होते
जसे बेफान होतो आपण
सांग मला विसरशील का ते क्षण ?????????
गेलो दोघेही आपल्या घरी
तरी ही जाणवत होता तो ओलावा त्या सरी
अजुन ही ओले होते आपले मन
सांग मला विसरशील का ते क्षण ?????????
दिवस होता नवा स्पर्श होता हवा
भेट होती आज या दोन जिवा
भिजून गेलो होतो दोघे ही जण
सांग मला विसरशील का ते क्षण ?????????
गच्च काळोख घट्ट मिठी
स्वप्न पहिले होते याच दिवसासाठी
दोन शरीर जरी असलो आपण तरी एक होत स्पंदन
सांग मला विसरशील का ते क्षण ?????????
सांग मला विसरशील का ते क्षण ?????????
लेखक :_______
सांग मला विसरशील का ते क्षण ?????????
Info Post
0 comments:
Post a Comment