Breaking News
Loading...
Sunday, 8 June 2008

Info Post
वस्नताच्या साक्षीने बहरुन तो बाहेर आला...
नव्या मित्रांच्या साथिने नवि दुनिया निहारु लागला...
कळत नकळत एके दिवशी, त्याचे तिच्याकडे लक्ष्य गेले...
आणि त्यालाहि कळले नाहि, कधी त्याचे अस्तित्व तिच्यात सामावुन गेले...

ती त्याच्याकडे बघुन, गालात खुद्कन हसलि...
आणि ते पाहुन आनंदाने त्याने एक गिरकि घेतली...
हळु हळु हि कुज बुज सगळीकडे पसरली...
राजाच्या गुलाम तिच्या बापाने, त्याला ईन्द्रछडिहि दाखवली...

तरी कधी नाही त्याने, उफ्फ न आहः केली...
अश्रुंचेही मोती बनवुन त्याने तिला वाहिले...
दिवस गेले आणि रात्र सुध्धा सरली...
मिलनाची स्वप्ने त्याची वार्यावरच तरळ्ली...

तिच्या प्रेमापायी त्याने, तारुण्याचा त्याग केला...
निरोपाचि वेळ आली, हे ग्रीष्म त्याल सांगुन गेला...
मरतांनाहि तो म्हनाला, जीवन माझे कृताथ्र झाले...
जिवंतपनी नाहि , पण मेल्यावर तरी तिने मल जवळ घेतले...

0 comments:

Post a Comment