ज्या अनेक बेभान करणार्या गोष्टी आजुबाजुला होत्या
त्या सगळ्याचा विसर पडावा इतकी ती सुंदर होती.
नजर फिरुन फिरुन तिच्याकडे वळत होती,
तिची मझी ओळख नव्हती,
पण हातांच्या हालचालीनं होणार्या बांगड्याच्या आवाजांन...
त्याच एका नादांची ओढ लागली होती.
अवघं आसमंत तिनं व्यापुन टाकलं होतं
माझ्यासकट सगळं विश्व तिच्यापुढं गहाण पडलं होतं.
काळ्या सावळ्या ढगांकडे पहावं की,
तिचं गुढ अनामिक व्यक्तिमत्व पहावं.
हिरव्यागार शालु नेसलेल्या जमिनीकडे पहावं कि,
तिच्या शितल वाटण्यार्या अस्तित्वानं बेभान व्हावं.....
छे!............. आज सगळीच उत्तरं हरवली होती.
आज सगळीच उत्तरं हरवली होती.
Info Post
0 comments:
Post a Comment