निळा नभ झाला काळा
आला आला हा पाऊस आला
दुर क्षितिजावर पाऊस करे येण्याचा इशारा
निरोप घेऊन त्याचा सुटला बेभान वारा
सोडुन आपली जागा उडाला जिर्ण पाला
सर्वत्र तो धो धो पडला
होता नव्हता तो येथेच झडला
जणु मातिच्या विरहात रडतो काढुन गळा
धरती नख शिंखात भिजली
गंध मातिचा पाण्यात विरळुन गेला
सोलावुन निघाली सारी धरती
पुन्हा आपले निरभ्र आकाश वरती
मातिच्या ह्रदयात पावसाचा ठसा अजुन ओला
पाऊस -कविता
Info Post
0 comments:
Post a Comment