१) मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
कुणीही पितांना दिसला
कि आशेनें पाहणारा
२) सगळीच वादळं मी
खिडकीत बसुन सोसली
अन् हि बाट्ली सुध्धा
खिडकीत बसुनच ढोसली
३) घरा भोवति कुंपन नको
म्हणजे नीट आत जाता येते
बायकोनं नाहि उघडलं दार
तर पायरीवरच झोपता येते
४) पाजणारं कोणी असेल तर
प्यायला तरुन तुर्य्क आहोत
स्वतःच्या पौशांनी प्यायला
आम्ही काय मूर्ख आहोत?
५) नेहमीच काव्याने नशा करु नये
कधी मद्दालाही वाव द्यावा,
तहानलेल्या रसिकांना
थोडी पाजुन भाव द्यावा
६) दारुडे बेहोश होउन कोसळतात
तेव्हा किंकाळी फोडत नाहित
याचा अर्थ असा नाहि की
त्यांची हाडे मोडत नाहीत
७) प्रत्येक तळीराम पितांना सांगतो
मी 'चषक' सोडणार आहे
चषक म्हणतो, तुझा संकल्प
मीच उद्या मोडणार आहे
काही भन्नाट चारोळ्या
Info Post
0 comments:
Post a Comment