Breaking News
Loading...
Tuesday, 3 June 2008

Info Post
असं भन्नाट धावते सार्‍या जगात फिरते
आता इथे आता तिथे भटकते माझे मन
बालपणात रमते मातीत खेळते
हुन्दाडते रनोवनी पदर आईचा धरते
गुरुजींची खाते छडी मारे कोलान्ट उडी
कधी असे छतावरि कढे जमीन पोपदी
असं भन्नाट धावते सार्‍या जगात फिरते
आता इथे आता तिथे भटकाते माझे मन
आठवणीत रमते सोनपंखी तरूणपण ते
हुंदारते बागे मध्ये सुरपारणब्या खेळते
डोंगरात झार्या खाली बेभान डुंबते
मित्रमैत्रिणीच्या संगे फुलपाखरू फिरते
असं भन्नाट धावते सार्‍या जगात फिरते
आता इथे आता तिथे भटकाते माझे मन
सुंदर शा स्वप्ना मध्ये कधी गाते प्रेम गाणे
मोरपंखी रंगमध्ये लिहिते उखाणे
अचानक काढे नको नको ते ओराखाडे
भळभळते जखम नको ते दुखणे
असं भन्नाट धावते सार्‍या जगात फिरते
आता इथे आता तिथे भटकाते माझे मन
संसारातील गमतीत रमते गमते
एका एका स्वप्ना साठी शिकस्त करते
क्षणोक्षणि सुखाची उजळाणी होते
भरे आनदांचे उर जागे नव्याने उमेद
असं भन्नाट धावते सार्‍या जगात फिरते
आता इथे आता तिथे भटकाते माझे मन

कवी : प्रल्हाद दुधाल ९४२३०१२०२०

0 comments:

Post a Comment